पुणे शहरातील एक 'सामाजिक व्यक्तीमत्व व राजकीय नेतृत्व'

गोपाळदादा तिवारी फोटो
← परत जा

मा. गोपाळदादा तिवारी

संक्षिप्त परिचय (कारकीर्दीचा आढावा)

पुणे शहरातील "सामाजिक जीवनात" अनेक वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी निष्ठा बाळगून निस्पृहपणे कार्यरत असलेले जेष्ठ सामाजिक व राजकीय व्यक्तीमत्व म्हणजे गोपाळदादा तिवारी!

पक्षाध्यक्षा श्रीमती सोनियाजी यांच्यावर अढळ श्रद्धा व नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून ते अनेक वर्ष कार्यरत आहेत. नारायण-सदाशिव पेठ भागातून पुणे मनपावर निवडून येऊन लोकाभिमुख कार्य केले आहे.

त्यांनी मनपाच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचा निर्णय, मनपातील १५ वर्षांचा ऑडिट बँक लॉग भरून काढणे, नागरी हितासाठी निर्णय घेणे इत्यादी कामगिरी बजावली आहे.

सारस बाग ट्रॅफिक पार्क, गरवारे बालभवन रोपवे प्रकल्पास विरोध, इंदिरा गांधी जनरल हॉस्पिटल, नदी पात्रातील रस्ते, सांस्कृतिक सभागृह, फिरत्या कचरा गाड्या, विद्यानिकेतन, स्मारके, शिवजयंती देखावे यांसाठी सातत्याने कार्य केले आहे.

महत्वाची पदे: युवक काँग्रेसमध्ये सचिव, सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस व अखिल भारतीय काँग्रेस महासमिती सदस्य पदे, निरीक्षक म्हणून महाराष्ट्रासह छत्तीसगड, हरियाणा, बिहार मध्ये कार्य केले.

लोडशेडिंग काळात दाहिनीचा प्रश्न, रेबीज लस उपलब्धता, नदी पात्रातील प्रश्न, आरोग्य व्याख्यानमाला, कलाकार सत्कार, विकास आराखडा, CNG प्रश्न, जुन्या वाड्यांचे प्रश्न यावर सतत लक्ष दिले.

१९९७ पासून सत्तेचे पद न मिळूनही पक्षनिष्ठा व स्वच्छ कारकीर्द राखली. निवडणूक काळात पक्षीय कार्य करण्यास नेहमी तत्पर राहिले.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत ज्योती अवॉर्ड, बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सुर्यकांत उर्फ नाना मारणे
मा. उपाध्यक्ष - पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

दिलीप मोरे
जेष्ठ काँग्रेसजन - पुणे शहर